
गावदरा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद गावदरा शाळेला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असतोच आत्ता तर ह्या शाळेला राज्याच्या बाहेरून ही मदत आली आहे. श्री विलास सोनवणे यांनी जो उपक्रम सुरु केला आहे तो म्हणजे ज्यांना आपल्या मुलांचा वाढदिवसाच्या आमच्या शाळेतील मुलांसोबत साजरा करायचा असेल तर तो वाढदिवस ह्या शाळेत साजरा करू शकतात. याला खूप शिक्षणप्रेमी यांनी प्रतिसाद दिला आहे. ह्या वेळी श्री किशोर अवतार (सिल्वासा दादारानगर हवेली व दमन दिव) यांनी त्यांचा मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावदरा शाळेला तब्बल पाच हजार रुपयांच्या भेटवस्तू म्हणून मदत पाठवली आहे, त्यात सर्व मुलांना मिक्स वही, गोल्डेक्स पेन,डोम्सचे किट्, दोन केक, सर्व मुलांना खाऊ म्हणून कचोरी आणि मुलांना आवश्यक म्हणून सिलिंग फॅन एव्हढे वस्तू मदत म्हणून पाठवले ह्यावेळी गावदरा शाळेतील शिक्षक श्री महेश थोरे सर व विलास सोनवणे यांनी सर्व विद्यार्थांना सोबत घेऊन चि.ॲलेन अवतार याचा प्रतिकात्मक स्वरूपात वाढदिवस साजरा करून घेतला. सर्व मुलांना इतके साहित्य मिळाल्याने मुले खूप आनंदीत झाले. म्हणून शालेय व्यवस्थापन समिती गावदरा यांनी श्री किशोर अवतार यांचे आभार मानले.
