
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिन्नर नगर परिषदेतील गटनेतेपदी नगरसेवक मनोज प्रतापराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सिन्नर नगर परिषदेत ठाकरे गटाचे १४ नगरसेवक विजयी झाले असून त्यानंतर गटनेतेपदासाठी ही निवड प्रक्रिया झाली खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली, या बैठकांना प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक मनोज देशमुख यांच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केले. उदय गोळेसर ,पंकज मोरे सागर कोथमीरे, अमोल झगडे ज्योती मोरे ,अंबिका धनगर सविता खोळंबे आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
