
नाशिक (प्रतिनिधी ) राज्यभरात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाचा मोठा फटका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी पगाराच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे राज्यातील सुमारे २५ लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2026 पहिल्याच दिवशी होणारा पगार झाला नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आंदोलनाचे मुख्य कारण
राज्यातील ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान काही दोषी आढळून आल्याने शिक्षणाधिकाऱ्यां वर गुन्हे दाखल करून अटक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा निषेध करत.. तसेच ती थांबवण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी विना नोटीस असहकार आंदोलनावर गेले आहेत. याचा
थेट परिणाम पगार प्रक्रियेवर झाला आहे. याचा महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेना तीव्र निषेध करीत आहे. अधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात आंदोलन करायला आमचा विरोध नाही मात्र शिक्षकांची वेतन थांबवण्याचा व शासनाचा राग शिक्षकांवर काढण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत. हे चुकीचे असून असे झाल्यास शिक्षणाधिकारी यांचे विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. – संजय चव्हाण. महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेना
