
नायडोंगरी (प्रतिनिधी) या वर्षीच्या केंद्र स्तरीय ‘जिल्हा परिषद अध्यक्ष चषक’ स्पर्धा २०२५/२६ या न्यायडोंगरी येथील स्व. गंगाधर (आण्णासोl.) शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विशाल प्रांगणात अतिशय उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
या स्पर्धांचे उद्घाटन “अध्यक्ष चषक चे जनक” व शनीमहाराज मंदिर संस्थान, नस्तनपूरचे अध्यक्ष माजी. आमदार ॲड. अनिलकुमार गंगाधर आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समिती चे गट शिक्षण अधिकारी श्री. दिलीप नाईकवाडे साहेब हे होते.

या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते त्यात
नांदगाव कृ.बा.स.चे सभापती दर्शन आहेर, कै.ॲड.वि.शि. आहेर हायस्कूलच्या प्राचार्या सौ. पल्लवीताई आहेर, शनी मंदिर संस्थान चे उपाध्यक्ष उदयअप्पा पवार,जनरल सेक्रेटरी खासेराव सुर्वे,केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील,पत्रकार जगन पाटील यांच्यासह न्यायडोंगरी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी क्रीडा, चित्रकला, वक्तृत्व आणि विविध सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने ॲड अनिल दादा आहेर हे नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून या ‘अध्यक्ष चषक’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते त्यात प्रथम प्रत्येक शाळा स्तरावर नंतर केंद्र, बिट, तालुका, व शेवटी जिल्हा स्तरावर स्पर्धा घेऊन विजेत्या शाळेस हा “मानाचा चषक” दिला जातो गेल्या तीस वर्षांपासून या स्पर्धा अव्याहत सुरू आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी विविध स्पर्धा मधून विजयी झालेल्या अडोतीस विद्यार्थी,संघ यांना शनी मंदिर संस्थान नसतनपूर यांचे कडून आकर्षक असे स्मृतीतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख श्री.राजेंद्र पाटील आणि नायडोंगरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाने यशस्वीरीत्या पार पाडले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सुभाष चव्हाण यांनी केले तर शरद पाटील सर्वांचे आभार मानले.
