
भालुर (प्रतिनिधी) मान्यवरांचा सत्कार*म.वि.प्र. संचलित जनता विद्यालय, भालूर येथे स्काऊट-गाईड मेळावा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवाभाव, जनता विद्यालय भालूर येथे स्काऊट-गाईड मेळावा उत्साहात संपन्ननेतृत्वगुण व राष्ट्रप्रेम रुजविण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष माननीय धनाजी भाऊ जठार हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजनाने झाली. ध्वजपूजन शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य दिनकर पाटील तसेच ज्येष्ठ सदस्य चांगदेव बाबा उगले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्काऊट-गाईड ध्वजारोहण विठ्ठल दादा आहेर यांच्या हस्ते पार पडले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी स्काऊट-गाईड प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करवर सर यांनी केले. स्काऊट-गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जीवनकार्याची व चळवळीच्या उद्दिष्टांची माहिती ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर यांनी सविस्तरपणे दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध जीवन जगत समाजसेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय वैद्य सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्काऊट-गाईड चळवळ ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात माननीय धनाजी भाऊ जठार यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमात विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मोरे सर, खैरनार सर व तासकर मॅडम श्रीमती शिनगारे मॅडम यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशैक्षणिक प्रगतीसाठी दिलेले मोलाचे योगदान मान्यवरांनी गौरवपूर्वक अधोरेखित केले.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी म.वि.प्र. संचालक माननीय अमित भाऊ यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नातून जनता विद्यालय भालूरसाठी चार नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्याची आनंददायी माहिती देण्यात आली. यामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक माननीय श्री. पाटील सर, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा यशस्वी व संस्मरणीय ठरला.
