
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन अंतर्गत दुर्वा एज्युकेशन समुपदेशन व प्रशिक्षण केंद्र डोंबिवली मार्फत गेली तीन वर्षे आम्ही दैनंदिन योग अभ्यास वर्ग घेत आहोत, या महिन्यात डिसेंबर मध्ये ३६ वा वर्ग पुर्ण झाला म्हणजेच या महिन्यात योग वर्गाला ३ वर्षे पुर्ण झाली. या निमित्ताने संस्थे मार्फत हा वर्ग सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता.
सदर योग वर्ग हा ऑनलाइनच्या माध्यमातून असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रभरातून अनेक साधकांनी याचा लाभ घेतला.
या वर्गामध्ये सौ. योगिता सकपाळ ( योग शिक्षिका ) यांनी सर्वांना अतिशय उपयुक्त अशी योग आसने शिकवली व योग्य ते मार्गदर्शन केले त्यामुळे सहभागी साधकांना स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी योग्य ती दिशा मिळाली.
