
मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात गणिताचा महामेरू श्रीनिवास रामानुजन यांना अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण व शिक्षक वृंद.
नांदगाव 🙁 प्रतिनिधी)- मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात गणिताचा महामेरू श्रीनिवास रामानुजन यांना अभिवादन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण व सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यालयातील उपशिक्षिका सरला बिडवे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या की, श्रीनिवास रामानुजन हे भारताचे महान गणितज्ञ होते. त्यांच्या विलक्षण प्रतिभेमुळे त्यांना ‘गणिताचा जादूगार’ म्हटले जाते. त्यांनी गणिताचे सूत्रे व प्रमेय शोधून काढली.

त्यांनी गणितातील संख्या सिध्दांत, अनंत श्रेणी, आणि कन्टिन्यूड फ्रॅक्शन्स यांमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांनी सुमारे ३९०० पेक्षा जास्त समीकरणांचे संकलन केले.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “रामानुजन यांचे जीवन ही गणिताला मिळालेली एक दैवी देणगी होती, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.” १७२९ या संख्येला ‘ हार्डी – रामानुजन संख्या ‘ का म्हणतात हे सांगितले.

याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
