
सिन्नर.(प्रतिनिधी) भारताचा सांस्कृतिक व ऐतिहासिक इतिहास शिल्पकलेच्या माध्यमातून निर्माण करण्याचे काम जागतिक दर्जाचे शिल्पकार राम सुतार यांनी केले.त्यांनी केवळ पुतळे घडवले नाही तर भारताच्या राष्ट्रभक्तीचा व राष्ट्र प्रेमाचा प्रकट वारसा निर्माण केला.त्या रामजी सुतार यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.
असे प्रतिपादन सेवानिवृत्त तहसीलदार महामित्र दत्ताजी वायचळे यांनी केले.
येथील पांचाळेश्वर मंदिरात आयोजित केलेल्या अभिवादन सभेत अध्यक्ष मनोगत बोलत होते.
दिवंगत सुतार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिवंगत राम सुतार यांनी आपल्या शंभर वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय इतिहास व संस्कृतीला आकार देण्याचे काम शिल्पकलेच्या माध्यमातून केले.असे त्यांनी सांगितले.
कलाकार हा कधीही मरत नसतो.तो कलेच्या माध्यमातून अमर झालेला असतो.दिवंगत राम सुतार यांनी निर्माण केलेल्या अजोड शिल्पकलेतुन पुढच्या पिढ्यांना इतिहासाचे स्मरण व त्यातुन प्रेरणा मिळेल.असे मत नामदेवराव कोतवाल यांनी व्यक्त केले.
हरीभाऊ तांबे यांनी ही दिवंगत सुतार यांचे संपूर्ण जीवनपट आदर्श व प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
संत गाडगेबाबा यांच्या 69 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नगरसेवक उदय गोळेसर अॅड.विनोबा गोळेसर. प्रकाश ठकसेन लोंढे. सावित्रीमाई फुले प्राथमिक विद्यालयचा मुख्याध्यापिका श्रीमती संगीता राजगुरू मॅडम, विनायक सुर्यवंशी.राजेंद्र राजगुरु आदींनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले.
गणेश सोमवंशी सुनिल जाधव पांडुरंग जाधव कचेश्वर भालेराव, संजय झगडे,अरुण निकम, राजेंद्र दिवे,विजय मुठे संकेत दिघे, वसंत भालेराव विनायक हिरे अरूण गाडेकर बबन भालेराव विशाल गवळी दर्शन भालेराव आदी उपस्थित होते.
