
मनमाड –(प्रतिनिधी)
येथील ओमकार संगीत विद्यालयाच्या वतीने येत्या बुधवारी २४ डिसेंबर रोजी थोर गायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्ताने लोकमान्य सभागृह,इंडियन हायस्कूल येथे सायंकाळी सहा वा.’याद न जाये बीते दिनोंकी…!’ हा संगीत मैफीलीचा कार्यक्रम होणार असून गुरूवर्य श्री सुनील
खांगळ यांचे मार्गदर्शनाखाली शिष्यगण सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची विविध शास्त्रीय व उपशास्त्रीय रागदारीवर आधारित गीते सादर करणार आहेत.
या मैफिलीस मनमाडकर संगीत रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओमकार संगीत विद्यालयाच्या कार्यवाहक मीनाताई खांगळ यांनी केले आहे.
