
पुणे,(प्रतिनिधी ) येथील एस एम जोशी सभागृहात दि दोन ते पाच जानेवारी या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल काव्य महोत्सव कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी सोलापूरच्या प्रा. नरेंद्र गुंडेली, दत्तात्रय इंगळे जमालोद्दीन शेख, व शैलेश, उकरंडे, या चौघांची निवड झाली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्य कर्तृत्वाचा प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याचा उद्दात्त हेतूने देशात पहिल्यांदा पुण्यात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलची सुरुवात गतवर्षी झाली येत्या जानेवारीमध्ये महोत्सवाचे दुसरे वर्ष असून या अंतर्गत कविता सादर करण्यासाठी या चौघांना निमंत्रण मिळाले याबाबत आयोजक विजय वडवेराव यांनी तसे निवड पत्र दिले आहे
