
नाशिक (प्रतिनिधी ) ता. 19 साहित्यात भावनाची ओल आणि ओढ असल्याशिवाय साहित्य परिपूर्ण होत नाही असे प्रतिपादन रमेश चौधरी यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात 211 वे पुष्प गुंफतांना रमेश चौधरी जीवनवेल या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तेजस्विनी कदम यांनी भूषवले.
रमेश चौधरी पुढे म्हणाले की, साहित्य हे अनुभवातून आकाराला येते. त्यामध्ये सुख दुःख यांचा वेळ साधत जीवनातील आनंद शोधण्याचा कवी सातत्याने प्रयत्न करत असतो. साहित्याप्रती असलेली आस्था शब्द बद्ध होत जाते आणि सुंदर साहित्याची तेव्हाच निर्मिती होऊ लागते.
यावेळी माणीकराव गोडसे, राजेंद्र देसले या भाग्यवान श्रोत्याना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
आभार तुकाराम ढिकले यांनी मानले तर सूत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले
दरम्यान येत्या मंगळवार 23 डिसेंबर रोजी तर डॉ.उषा शिंदे या निरक्षराचे अक्षरलेणे या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
