
मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी विजय काकळीज, नितीन जाधव,हरीचंद्र ठाकरे, ज्योती काळे,पूनम मढे, अविनाश सोळंके, दिपक चव्हाण, अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक वृंद.
नांदगाव -( प्रतिनिधी)- मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात नुकतेच भव्य विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नियोजित अध्यक्ष विजय काकळीज ( अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती)यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी नितीन जाधव,प्राचार्य हरीचंद्र ठाकरे, प्राचार्या पूनम मढे, मुख्याध्यापक अविनाश सोळंके उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे हे सांगितले.
उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देणारी एक उत्तम संधी असते हे सांगितले.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, आजचा हा विद्यार्थी उद्याचा शास्त्रज्ञ आहे. विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्याचे आव्हान केले.
या प्रदर्शनामध्ये इ.५वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ४० हून अधिक प्रकल्प मांडण्यात आले होते.यामध्ये पर्यावरण आणि ऊर्जा, आरोग्य आणि तंत्रज्ञान, गणिताचे सोपे प्रयोग, समाज उपयोगी प्रकल्प, तसेच या प्रकल्पांमध्ये दैनंदिन जीवनातील समस्यांवर आघाडी उपायांपासून ते जतिन वैज्ञानिक संकल्पना पर्यंत अनेक विषय हाताळण्यात आले होते. तसेच वैज्ञानिक स्व-छाया चित्रनस्थळ (सेल्फी पाँइंट) तयार करण्यात आला होता. तसेच वैज्ञानिक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
अध्यक्षीय मनोगत विजय काकळीज यांनी प्रथम विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे आणि परिश्रमाचे कौतुक केले व “या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला योग्य दिशा मिळाली आहे. भावी पिढीमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे हेच या प्रदर्शनाचे मोठं यश आहे.”
विजयी—–
मोठा गट —
प्रथम क्रमांक – भूषण सोळूंखे
व्दितीय क्रमांक – कृष्णा घोडके
लहान गट —
प्रथम – श्रीकृष्ण कुमावत
व्दितीय – शुभांगी निकम व साक्षी महाजन
दिव्यांग गट —
नयन महाजन, साई नवले
मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे -पाटील सर्व बाल वैज्ञानिकांचे कौतुक केले व प्रदर्शनात विजयी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता आण्णासाहेब दुकळे, अजित पगार,भाऊसाहेब सोनवणे, गजेंद्र माताडे, नरेंद्र पाटील,प्रणोद गोटे,जया गवळी, सरला बिडवे, सविता बोरसे, यशवंत काकळीज तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया गवळी तर आभार भाऊसाहेब सोनवणे यांनी मानले.
