नाशिकरोड ( प्रतिनिधी )दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक.या शाळेत आज गुरुवार दि.१८/१२/२०२५ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा संचालक डॉ.मिनाक्षी गवळी(क्रीडा संचालक,के.टी.एच.एम.कॉलेज, नाशिक.) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान प्रतिमा पूजन करुन आणि आकाशात फुगे सोडून वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्साहात उदघाटन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकातून शालेय जीवनात खेळायला किती महत्त्व आहे,हे सांगतांना विद्यार्थिंनींनी कुठलातरी खेळ अंगीकृत करुन व चांगल्या सवयीने एक उत्तम खेळाडू तयार झाले पाहिजे.आजची जीवनशैली यांत्रिक व बैठ्या स्वरुपाची झाली आहे.म्हणून खेळ खेळणे किंवा छंद जोपासणे हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे.तसेच राष्ट्रीयस्तरावरील विद्यार्थिंनींनीचे विशेष अभिनंदन करुन सर्व सहभागी विद्यार्थिंनींना शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुण्यांचे परिचय व क्रीडा अहवाल वाचन उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ,श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आले. याप्रसंगी कु.राखी भोसले या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली कु.मोनिका तलवारे,कु.हर्षाली हाडस,कु.मिनाक्षी खडके,कु.योगिता पवार,कु.जयश्री पवार,कु.कविता माळघरे,कु.दिपिका बागुल,कु.यशोदा बागुल,कु.प्रमिला कान्हत,कु.जागृती मोर,कु.राशी वांगड,कु.सुमिता डोल्हारे, कु.अश्विनी रांजड,कु.सुलक्षणा खरपडे यांच्या सहभागातून क्रीडा ज्योतीचे आगमन मैदानावर करण्यात आले.व मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.तसेच खो-खो राष्ट्रीय खेळाडू कु.मोनिका तलवारे या विद्यार्थिंनींनी उपस्थित सर्व खेळाडूंना शपथ दिली.७-अ च्या विद्यार्थिनींनी सुंदर असे खेळ संदर्भात नृत्य सादर केले.त्यांना रुपाली जोशी यांनी मार्गदर्शन केले.तसेच आपत्कालीन परिस्थितीत शालेय विद्यार्थिनींनी काय करावे,यासाठी सोपान हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टीमने "जागर आरोग्याचा" यावर आधारित पथ्यनाटिका सादर करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.मिनाक्षी गवळी यांनी आपल्या मनोगतातून आयुष्यात खेळाबरोबरच योगसाधनेला महत्त्व देऊन आपले जीवन समृद्ध करावे,हे सांगतांना तुम्हाला काय करायला आवडेल,विविध खेळाचे व एकाग्रतेचे महत्त्व आणि त्यात तुमची स्वतः ची भुमिका कशी असली पाहिजे,हे उदा.तून त्यांनी कथन केले.पुढे त्यांनी भ्रामरी प्राणायामाचे महत्त्व विद्यार्थिनींनीकडून प्रात्यक्षिकेतून करुन घेतले.खेळ आपल्याला शिस्त शिकविते.त्यासबरोबर तुमच्या आवडीचे छंद जोपासून स्वतः कडे लक्ष द्या,तुमचे आयुष्य सुंदर करा.आणि स्वतः वर विश्वास ठेवा.असे सांगून सर्वांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आजच्या स्पर्धा प्रमुख शिक्षकांचेही गुलाबपुष्प व स्पर्धा कीट देऊन सत्कार करण्यात आले.त्यांची यादी वाचन गव्हर्निंग कौन्सिल सदस्य कैलास बागुल यांनी केले.यावेळी सांघिक व वैयक्तिक असे विविध खेळ घेण्यात आले.त्यात सर्वच विद्यार्थिंनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन आपला आनंद व्दिगुणित केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व मिलिंद कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन गव्हर्निंग कौन्सिल सदस्या भारती चंद्रात्रे यांनी तर आभार गव्हर्निंग कौन्सिल सदस्य कैलास बागुल यांनी केले.फलकलेखन सायली मुळे यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी,सेक्रेटरी हेमंत बरकले,शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे,अधिक्षिका मीना वाळूंजे,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी,ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे,पर्यवेक्षिका सुषमा गवारे,गव्हर्निग कौन्सिल सदस्य कैलास बागुल,भारती चंद्रात्रे,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिंनी उपस्थित होते.