
नांदगाव (प्रतिनिधी)मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मनमाड येथे मातृपितृदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्राचार्या आहेर शितल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. पालकांच्या शुभहस्ते विद्येची देवता माता सरस्वती प्रतिमा तसेच अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिक्षिका गायकवाड ए.के.यांनी विद्यार्थ्यांना मातृपितृदिनाचे महत्त्व, आई वडिलांचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. ह्या जगात आईच्यापोटी आपण जन्मास येतो पण ह्या जगाची खरी ओळख वडील करतात, आपले पालनपोषण सर्व आई वडिलांवरती अवलंबून असते आजचे अनाथालयाचे वाढत चालले प्रमाण कुठे तरी बंद व्हावे यासाठी मुलांवरती लहानपणी पासूनच संस्कार होणे गरजेचे आहे म्हणून मातृदेवो भव,पितृदेवो भव या मुल्यांची जोपासना करने काळाची गरज आहे अशी माहिती दिली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांसोबत दिलेल्या वेळेत शाळेत मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. आपल्या आई – वडिलांचे जोडीने पुजन करुन, नमस्कार करून आई वडिलांचे आशिर्वाद घेतले.

याप्रसंगी अनेक पालकांचे डोळे पाणावले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व
आभारप्रदर्शन शिक्षिका घोरपडे एस.एस.यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने झाली.
कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यी उपस्थित होते.
