सिन्नर ( प्रतिनिधी) दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिन्नर येथे शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रप्रमुख दत्तात्रय गवळी साहेब यांनी माझ्या कारकिर्दीतले भव्य दिव्य शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन बघण्याचा योग आल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती, जिज्ञासू वृत्ती आणि कलागुणांना वाव मिळण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे साहेब,सेक्रेटरी नामदेव लोणारे साहेब,शा.व्य.स. माध्य.विभाग अध्यक्ष मंगलताई झगडे मॅडम, सहसेक्रेटरी संजय माळी साहेब, प्राचार्य मधुकर देशमुख, प्राथ.विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता राजगुरू,प्र.पर्यवेक्षिका सविता काठे हे सर्व मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी बनवलेली उपकरणे, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे कष्ट आणि योगदान हे बहुमोल आहे असे गौरवोद्गार संस्थेचे सेक्रेटरी नामदेव लोणारे यांनी अध्यक्षीय मनोगतातून काढले.
विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मंगेश आव्हाड व गोकुळ गंधके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वास गावित, सागर नन्ने,आनंद महात्मे,पल्लवी गवारे, सबुरी रंधे,भास्कर साळवे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्राथमिक गटात 70-80 व माध्यमिक गटात 25-30 उपकरणे मांडण्यात आली होती.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विज्ञान समिती प्रमुख माधुरी वरंदळ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रज्ञा कर्डक यांनी मानले.
आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिन्नर येथे शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रप्रमुख दत्तात्रय गवळी साहेब यांनी माझ्या कारकिर्दीतले भव्य दिव्य शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन बघण्याचा योग आल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती, जिज्ञासू वृत्ती आणि कलागुणांना वाव मिळण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले.