
नाशिक रोड ( प्रतिनिधी) – ब्राह्मण सभा नाशिक रोड संस्थेचे सद्या दसक, जेलरोड, नाशिक रोड येथे सुसज्ज सभागृह आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून विद्यार्थी वसतीगृह दुसऱ्या मजल्यावर होईल व परदेशात मुलं असून एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध पती पत्नी यांचेसाठी तिसऱ्या मजल्यावर वसतीगृह असेल. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब पुजन सौ.व श्री राजेश दीक्षित यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ब्राह्मण सभा कार्यकारणी पदाधिकारी तसेच देणगीदार उपस्थित होते. सौ व श्री दीक्षित त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ दीक्षितांनी आपल्या मनोगतात ब्राह्मण सभा चार मजल्याचे बांधकाम सिंहस्थापुर्वी पुर्ण होणे साठी शुभेच्छा व सहकार्याचे आश्वासन दिले.

श्री मुकुंद कुलकर्णी अध्यक्ष यांनी समाजाचे काम असलेने कार्यकारणी पदाधिकारींनी देणगी संकलनासाठी अथक प्रयत्न करावे असे आवाहन केले.
श्री सुरेश कुलकर्णी, डॉ .पापरीकर, विधीतज्ञ शेखर रास्वलकर, विश्वस्त के.पी.कुळकर्णी, दिलीप भिंगारकर,अनघा कुळकर्णी, अनघा जोशी, सुनील मेंढेकर यांनी देखील नारळ फोडून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास ज्ञाती बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
