
उभी राहणारी आणि उभी राहिलेली प्रत्येक शिल्पकृती दादा तुमचे अस्तित्व मांडत जाईल…
जागतिक शिल्पकलेचा तपस्वी काळाच्या पडद्याआड..
शिल्पकार रामजी सुतार साहेब
🪻भावपूर्ण आदरांजली🪻
वयाच्या १०० व्या वर्षांपर्यंत ते कार्यरत होते
राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारला. या पुतळ्याचे वजन १७०० टन आहे
शिल्पकलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला होता. त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला.
राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे
नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे एक वैशिष्ट्य होते.
रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला, त्यांना
महामित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण सुमनांजली
