
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२३ वा दिवस
ज्ञानयोग्याचे या जीवनातील अंतिम ध्येय जीवन्मुक्त होणे हेच असते. जो या जगात अनासक्त होऊन राहू शकतो तोच जीवन्मुक्त होय. तो पाण्यात वाढणाऱ्या कमलपन्नासारखा असतो; ही पाने पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाहीत; तद्वत् हा माणूस जगात राहूनही जगाने लिप्त होत नाही. हा माणूस केवळ सर्व मानवांहूनच नव्हे, तर सर्व प्राण्यांहूनही श्रेष्ठ असतो, कारण त्याला त्या निरपेक्ष सत्तेशी आपल्या ऐक्याचा साक्षात्कार झालेला असतो, त्याला 'मी ईश्वराशी एकरूप आहे' ही अनुभूती झालेली असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २७ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५
★ २००० इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचा स्मृतीदिन
★ २००४ भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा स्मृतीदिन
★ राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन.
★ अस्पृश्यता निवारण दिन.
★ आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन…
