
नाशिक ( प्रतिनिधी ) प्रवास करताना अनेक अनुभव घेऊन जे आत्मसात केले. ते अनुभव म्हणजे लडाख डायरी असे प्रतिपादन आर्कीटेक्ट विजय पवार यानी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात लडाख डायरी या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौशाडकार डॉ. नंदकुमार राऊत होते.
विजय पवार पुढे म्हणाले की, प्रवास करणे म्हणजे नुसते फिरणे नाही तर तेथील निसर्ग,नदी,डोगंररागा, पर्वत, वैशिष्ट्यपुर्ण ठिकाण याचे निरिक्षण करता आले पाहिजे. लडाख मध्ये बुलेट चालवण्याचा आलेला अनुभव हा जिवघेणा असला तरी बर्फातुन मार्ग काढताना बर्फाचे रस्ते त्यातुन मार्ग काढताना बर्फाचा पांढरा रंग धोक्याची खुण असते. लेह लडाख, कारगील अशा भागातून प्रवास करताना जिवनातील अनेक पैलूचा उलगडा झाला. दुर्गम भागातील मानवी जीवन समजुन घेतले पाहिजे.
यावेळी रवींद्र पाटील, अशोक पाटील या भाग्यवान श्रोत्याना ग्रथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले.
सुहास टिपरे यानी आभार मानले. तर सुरेश पवार यानी सुत्रसचालन केले.
दरम्यान येत्या
शुक्रवारी 19 रोजी रमेश चौधरी जिवनवेल या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
