
भोसरी (प्रतिनिधी) नक्षत्राचं देणं काव्यमंच व पिंपरी चिंचवड मनपा(शिक्षण विभाग प्राथमिक )आयोजित…बाल काव्य मैफलकर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रंगणार बाल काव्यमैफल 2025 पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची विशेष अनोखी काव्य मैफल आयोजित केली आहे. कार्यक्रम प्रमुख पाहुणे मा. श्रावण हार्डीकर (आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा ), मा.संगीता बांगर ( प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा )मा. किरण गायकवाड ( समन्वय अधिकारी -मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड मनपा )विशेष उपस्थित श्रीकांत चौगुले( ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, समन्वयक )सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका इ. उपस्थित राहणार आहे.कार्यक्रम स्थळ-पिंपरी चिंचवड मनपा कन्या शाळा, तळमजला सभागृह, चिंचवड स्टेशन, चिंचवड,पुणे 19 येथेकार्यक्रम दिनांक व वेळ दिनांक- 20 डिसेंबर 2025 ( शनिवार)( कर्मयोगी संत गाडगे महाराज पुण्यतिथी )ला वेळ- सकाळी 11 ते 4 यावेळेत रंगणार आहे. आयोजन व संयोजन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे( कवी वादळकार- पुणे ) संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नक्षत्राचं देणं काव्यमंच यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना यात सहभाग असणार आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या रचनासह सभागृहात वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे . सर्वांना विनामूल्य प्रवेश व सहभागाबद्दल आकर्षक फोर कलर सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
