
नासिक (प्रतिनिधी )= साहित्य रत्न साहित्य मंच आयोजित स्वर्गीय हरिश्चंद्र त्रंबक राव टिपरे हिवाळी साहित्य मैफिल 2025 राणी भवन येथे उत्साहात संपन्न झाली
राणी भवन नाशिक येथे हिवाळी साहित्य मैफिल उत्साहात संपन्न झाली, यात विविध असे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मा.पूजाबाई दगडू पाटील या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा.सुहास टिपरे हे देखील उपस्थित होते, कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध गझलकार मा.बाळासाहेब गिरी यांनी केले, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण विशेष निमंत्रित सेवानिवृत्त वायुसैनिक मा नामदेवराव हुले हे उपस्थित होते, कार्यक्रमात तब्बल 40 कवींनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या. यात गायन स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या याचे परीक्षण व्याख्याते व कायदे अभ्यास सुशील शिंदे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन निवेदिका अश्विनी सांगळे यांनी केले, आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, आणि यावर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे अनेक दानशूर व्यक्तींनी गरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत केली,
सन्मानप्राप्त व्यक्तींची नावे
अर्चना पाटील( नारी सन्मान)
सुनंदा पाटील( साहित्य गौरव)
दिनेश खैरे (साहित्य गौरव)
अविनाश ढळे( युवा आदर्श गौरव सन्मान)
यशवंत पगारे( काव्य प्रज्ञा सन्मान)
सह्याद्री नाठे( शिक्षण सेवा सन्मान)
विविध स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे
निकाल पत्र
काव्यवाचन स्पर्धा (लहान गट)
प्रथम क्रमांक: श्रावणी रंजना नंदू खातळे
द्वितीय क्रमांक: सम्राज्ञी प्रवीण सूर्यवंशी( आदरणीय गिरी सरांनी सम्राज्ञीला नाशिकची शांता शेळके ही उपाधी दिली)
:काव्यवाचन स्पर्धा (मोठा गट)
प्रथम क्रमांक: कावेरी मनीषा दीपक मदने
द्वितीय क्रमांक : अर्चना परदेशी
तृतीय क्रमांक: माणिकराव गोडसे
चतुर्थ क्रमांक विभागून: सह्याद्री शिलाबाई संजय नाटे
प्रशांत दामले
पंचम क्रमांक: प्रतीक्षा समाधान अहिरे
:प्रश्नमंजुषा स्पर्धा निकाल
महिला विभाग: प्रतीक्षा समाधान अहिरे
पुरुष विभाग: विनोद बबनदादा बैरागी
:🎤 गायन स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक :अर्चना परदेशी
द्वितीय क्रमांक :सम्राज्ञी प्रविण सुर्यवंशी
तृतीय क्रमांक: गायत्री संदीप गवारे
चतुर्थ क्रमांक विभागुन : प्रमोद पुंडे
अपुर्वा विश्वजीत कापडणीस
