
कळमदरी ( प्रतिनिधी): कै. मा. भा. वा. हिरे माध्यमिक विद्यालय कळमदरी येथील
विद्यालयात माजीमंत्री स्वर्गीय डॉ. बळीरामजी हिरे यांच्या जयंती उत्सव निमित्त तालुकास्तरीय चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.
विद्यालयाच्या प्रांगणात चित्र रंगभरण स्पर्धचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्यवर श्री .प्रवीण कोठावदे आरोग्याधिकारी अध्यक्षस्थानी होते या स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. श्री चौधरी सर मुखाध्यापक आश्रम शाळा सरताळे व अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चेअरमन श्री . सदाशिव देसले, श्री, आबासाहेब पगार संरपच, डॉ कोठावदे आरोग्य अधिकारी, चंद्रकात पगार माजी संरपच ,श्री रमेश पगार माजी संरपच ,श्री मनोज पगार माजी सरपंच , श्री दिपक पगार पो पा, , श्री नाना परदेशी, श्री सुनिल पगार , इत्यादी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री एस पी मोरे सर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर एन पवार यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री एस.पी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक श्री एस पी मोरे, श्री एस आर ठाकरे श्री आर एन पवार , श्री जाधव आर इ श्री आहेरे आर अ, श्री शिसोदे एस जे , श्री पगार बी बी , श्री ह्यालीज आर.बी.यांनी परिश्रम घेतले. आभार श्री जाधव सर यांनी मानले
