
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११९ वा दिवस
उच्चतम सत्याचा जगात सर्वत्र प्रचार व प्रसार करा. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडी देखील तडजोड करू नका. तुमचा मानसन्मान नष्ट होईल किंवा अप्रिय संघर्ष निर्माण होईल असे भय बाळगू नका. निश्चित जाणून असा की नाना प्रकारची प्रलोभने समोर असूनही जर तुम्ही सत्याला बांधील राहाल तर तुमच्या ठायी अशी दैवी शक्ती उत्पन्न होईल की जिच्यासमोर, तुम्ही ज्या गोष्टी सत्य मानीत नाही त्यांच्यासंबंधी तुमच्याशी बोलण्यास लोकांना भय वाटेल. सतत चौदा वर्षे तुम्ही जर कठोरपणे सत्याचे अखंड पालन करु शकला तर तुम्ही जे म्हणाल त्यावर लोक पूर्ण विश्वास ठेवतील.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १४ डिसेंबर २०२५
★ श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती, गुलाल
★ १५०३ सुप्रसिध्द ज्योतिषी, भविष्यवेत्ता, गणितज्ञ नॅस्टो डॅमस् यांचा जन्मदिन
★ १९४६ काँग्रेस नेते, इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचा जन्मदिन
★ १९७७ कवी, लेखक, गीतकार, पटकथाकार, अभिनेते, गीतरामायणकार, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गजानन डिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी
★ राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन.
