
डावीकडून लेखक विलास शेळके, केजी गुप्ता, सुबोध मिश्र, कन्हैयालाल कलाणी
नाशिक ( प्रतिनिधी )विलास शेळके लिखित ‘धरणसूक्त ‘ ह्या मराठी कादंबरीच्या हिंदी अनुवाद,’बाॅंध और बिजली’ (अनुवादिका श्रीमती प्रभा शेटे )चे प्रकाशन विद्योत्तमा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा हिंदीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.सुबोध मिश्र यांच्या हस्ते झाले.त्यांनी आपल्या भाषणात कादंबरी विषयी गौरवोद्गार काढतांना सांगितले की,’धरणाच्या बांधकामा सारख्या वेगळ्या विषयावर हिंदीच काय कोणत्याही भारतीय भाषेमध्ये कादंबरीचे लिखाण झालेले नाही त्यामुळे ह्या कादंबरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.ह्या कादंबरीचा पैस अतिशय मोठा असून वर्णन शैली अतिशय चित्रमय आहे.त्यामुळे यावर एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट निर्माण व्हायला हवा.’. लेखक विलास शेळके यांनी ह्या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया विशद केली . कार्यक्रमाला हिंदी व मराठी साहित्याचे अनेक रसिक उपस्थित होते.त्यावेळी मराठी प्रमाणे ही हिंदी कादंबरी देखील वाचकांना आवडेल अशी आशा व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कन्हैयालाल कलाणी आणि ज्येष्ठ उद्योजक श्री.कृष्णचंद्र गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते.
