
म्हाळुंगे पडवळ ( प्रतिनिधी ) द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा आयोजित नारी शक्ती व नवनियुक्त प्रशासकीय अधिकारी सन्मान सोहळा गुरुवार दिनांक २७ मार्च ३०२५ रोजी शिरूर या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावच्या सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षा, दत्त नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन, बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या जयश्री राजेश दहितुले यांचा नारीशक्ती पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. तसेच मंचर येथील ऋणानुबंध वधू वर सूचक केंद्राच्या संस्थापिका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर संघटक मराठा युथ असोसिएशनच्या राज्य संघ सचिव सुवर्णा संजय डोंगरे यांचाही नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सदर पुरस्कार घोडनदीबार वकील संघटनेच्या उपाध्यक्ष ॲड वर्षा सोनकांबळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या निर्मला संकपाळ, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अन्सार शेख, द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला राज्य अध्यक्ष रुपाली सावंत, राज्याध्यक्ष रोहित वाळके, सावित्रीबाई महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका कांताताई पांढरे, प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या अर्चना दीदी या सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
