
न्यायडोंगरी ( प्रतिनिधी) शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगाव तालुका उपप्रमुख शशिकांत वस़ंत मोरे ( वय ४५) यांचे बुधवारी दि. २६/३/२०२५ रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटात त्यांचा प्रभाव होता. २०११-२०१२ मध्ये त्यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत न्याय डोंगरी गणातील पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाले होते. तसेच न्याय डोंगरी ग्रामपंचायतीत ही सत्ता मिळवली होती.सर्व सामान्य जनतेचे त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावली होती.त्यांच्यावर गुरुवार दि. २७/३/२०२५ रोजी दुपारी न्यायडोंगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.माजी आमदार ॳॅड. अनिल आहेर,माजी सभापती विलास आहेर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
