
नाशिक ( प्रतिनिधी).आपली संस्कृती आणि परंपरा यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या गीता परिवार नाशिक व रुद्रेश्वर महादेव मंदिर गोविंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंद नगर येथे गुढीपाडव्यानिमित्त ढोलताशे, लेझीम व शंखनादाच्या गजरात भव्य शोभायात्रा निघणार आहे.यांचबरोबर लाठीकाठी, भजन ग्रुप, दांडपट्टे प्रात्यक्षिक असणार आहे.रथात विराजमान असलेले रामायणातील पात्रांचे सजीव देखावे हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण आहे. शोभायात्रा आयोजनासाठी सौ. शैलजा ब्राह्मणकर ,सौ. अश्विनी नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. शोभायात्रा सकाळी ७ वा. गणपती मंदिर येथून सुरु होणार असून सकाळी 8-30 पर्यंत शांती उद्यान येथे सांगता होईल. सौ. सीमाताई हिरे, आमदार यांचे मार्गदर्शन व सांगता समारंभात होणार आहे. शोभायात्रेसाठी पुरुषांनी कुर्ता पायजमा व महिलांनी पारंपरिक वेषात काठपदर साडी लाल रंगाची नेसावी. शोभा यात्रेत जास्तीत जास्त संख्येने गोविंद नगर व जवळपासच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.शोभयात्रा हीं अगदी वेळेत सुरु होणार आहे त्यामुळे सर्वांनी वेळेवर यावे.
