
मनमाड -: येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये दप्तर मुक्त -आनंदी शनिवार उत्साहात साजरा करण्यात आले. त्यासाठी १ली ते ४थी वर्गासाठी मराठी कविता सादरीकरण तर ५वी ते ८वी साठी लघु कथा सादरीकरण अशा स्पर्धेचे नियोजन केले. अनेक विद्यार्थ्यांनी त्या मध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका सुप्रिया शिंदे यांनी केले.

१/४ च्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचा निकाल १- ईश्वरी काळे २- आरुष खोडके – देवांक्षा काजीकर ३- स्वरा जाधव तर उत्तेजनार्थ कावेरी डगळे शिक्षिका गायकवाड तर ५/८ च्या स्पर्धेचा निकाल १- नम्रता पाटील २- भक्ती केकाण ३- आलिफिया रानावाला तर उत्तेजनार्थ -आसावरी राऊत शिक्षिका मोरे यांनी लावला. मुख्याध्यापिका आहेर एस.आर. यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडल्यात. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

