
’नाशिक (प्रतिनिधी) सुप्रसिद्ध लेखक.डॉ कैलास कमोद.यांच्या *भवरे की गुंजन* या पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले आहे.निवडक हिंदी चित्रपट गीतांचा मनोरंजक रसग्रहण असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहेयावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा विख्यात गायिका रागिणी कामतीकर असणारं आहेत. गाण्याचे संगीत,गीतरचना ,पडद्यावरील दृश्य, गाण्यातील सौंदर्य स्थळे,शोधून त्याचे रसग्रहण या पुस्तकात आहे.*रविवार 30 मार्च 2025* रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. शंकरा चार्य न्यास ,गंगापूर नाका येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने व्हावे, असे आवाहन वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार यांनी केले आहे.

