
आसरखेडे. ( प्रतिनिधी) . जनता विद्यालय आसरखेडे येथे नुकतेच शालेय विज्ञान प्रदर्शन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष युवा उद्योजक श्री वैभव रामभाऊ निमसे होते. तर उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते श्री विजयराव जाधव. व प्रमुख अतिथी म्हणून आसरखेडे गावचे पोलीस पाटील श्री मनोज जाधव व म. वि. प्र चे जेष्ठ सभासद श्री नामदेवराव दिवटे, शालेय समितीचे सदस्य श्री साहेबराव चव्हाण व रेणुका इव्हेंट हाॅलचे संचालक श्री अजय भाउ जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सी आर. कापडनीस यांच्या हस्ते करण्यात आला. प्रदर्शनात असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेउन नाविन्यपूर्ण विज्ञान उपकरणे प्रदर्शनात मांडली होती. परीक्षक म्हणून सर्व मान्यवर व मुख्याध्यापिका श्रीमती सी आर कापडनीस व सर्व विज्ञान शिक्षकांनी भुमिका पार पाडली. तसेच प्रदर्शन यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका श्रीमती ए. एन.काळे, श्री एस.एस.पद मने. श्रीमती यु. एस. पगार यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
