
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव मतदार संघाचे आ.सुहास आण्णा कांदे यांची महाराष्ट्र शासनाच्या विविध जाती व भटक्या जमाती. कल्याण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या समितीत १० आमदारांची निवड झाली आहे. राज्यातील विविध जाती आणि भटक्या जमातीच्या विकासाच्या विविध योजना पूर्ण करण्यासाठी विविध जाती व भटक्या जमाती कल्याण समिती कार्यरत असते.अशा महत्व पूर्ण समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यावर सोपवण्यात आली. आमदार सुहास कांदे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता होती.परंतु ती संधी हुकली असली तरी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. सुहास कांदे या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपविली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
