
कन्नड (प्रतिनिधी )
त्रैमासिक तिफण, तिफण वाचक चळवळ आणि भाषा , साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड यांच्या वतीने कन्नड तालुक्यातील बालखेड येथे राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सवाचे आयोजन ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले आहे. कवी राजेंद्र दिघे हे उदघाटक म्हणून उपस्थित राहाणार आहेत. या कविता महोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न होतात. त्यातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री प्रतिभा खैरनार (नांदगाव जि. नाशिक ) यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगणार आहे. प्रतिभा खैरनार या स्त्रीवादी जाणिवेने लेखन करणाऱ्या नव्या पिढीतील महत्वाच्या कवयित्री आहेत. त्यांचे तू मृगजळ जणू, बाभूळ फुलं, पडसावल्या, आणि वंशावळीच्या प्राचीन सरीतून हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक राज्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्रतिभा खैरनार यांच्या निवडीबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. विजय भोसले, ॲड. कृष्णा जाधव, स्वागताध्यक्ष अशोकसिंग शेवगण, कविता महोत्सवाचे संयोजक डॉ. शिवाजी हुसे, संयोजन समितीचे डॉ. रामचंद्र झाडे, प्रविण दाभाडे, अरुण थोरात, ज्ञानेश्वर गायके, लक्ष्मण वाल्डे, संदीप ढाकणे, भिमराव सोनवणे, श्रीराम दापके, भरत सोनवणे, संदीप वाकडे, अनिता राठोड, शुभदा देवरे, गितांजली गजबे, सुभाष काळे, सुरेश औटे, का. का. थोरात, शिवनाथ गायकवाड, प्रा. सूर्यकांत सांभाळकर, प्रा. रमेश वाघचौरे, अमोल मोकाशे, अजय दवंडे, प्रकाश शहरवाले, ब्रम्हगिरी गोस्वामी, आदींनी अभिनंदन केले आहे.
