
दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमाच्या माध्यमातून नासाका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना जॅकेट्स प्रदान करताना कवी सुभाष उमरकर, कैलास पगारे, मुख्याध्यापक अरुण पगार आदी.
नाशिकरोड:- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून गरजूंना कवी सुभाष उमरकर आणि त्यांचे सहकारी सुप्रसिद्ध वादक कैलास पगारे यांनी २१ उबदार जॅकेट्सची भेट देत अनोखी ऊब दिली.
नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून आयोजित केलेल्या ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात रोजीरोटीसाठी धडपड करणाऱ्या कवी सुभाष उमरकर यांनी आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून दिलेले जॅकेट्स मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अधिक समाधान दिसून आले. मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी सन्मानचिन्ह देत पाहुण्यांचे स्वागत केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.
