
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११३ वा दिवस
मन जाणिवेच्या पलीकडे जाऊ शकते, आपले मन जणू एखाद्या तलावासारखे आहे, आणि आपण करीत असलेला प्रत्येक विचार म्हणजे जणू त्या तलावात उठणारा एकेक तरंग, एकेक लाट आहे. ज्याप्रमाणे तलावात तरंग किंवा लाटा उसळतात, कोसळतात आणि विरून नाहीशा होतात, त्याचप्रमाणे चित्तातही विचारांचे तरंग वा लाटा सतत उठत असतात आणि मग विरून जात असतात; पण त्या अजीबातच नाहीशा होत नसतात. चित्तात उठणारे ते तरंग वा त्या लाटा क्रमशः अधिकाधिक सूक्ष्म होत जातात, परंतु सूक्ष्मस्वरूपात विद्यमानच राहतात, आणि प्रयोजन पडताच केव्हाही फिरून उदित होण्यास तत्पर असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १७ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ८ डिसेंबर २०२५
★ १७२१ आधुनिक पुणे नगराचे शिल्पकार श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचा जन्मदिन
★ १८७७ महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती यांचा जन्मदिन
★ १९३७ भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
★ १९७१ भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
★ १९८५ सार्क राष्ट्रांची संघटना स्थापना दिन.
★ जागतिक मतिमंद दिन.
