
अंदरसूल (प्रकाश साबरे ).
अंदरसूल येथे सालाबादप्रमाणे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व दत्तजयंती उत्सव निमित्ताने गुरूचरित्र पारायण जपानुष्ठाण सोहळा तसेच हजारो वर्षांपूर्वी अगस्ती ऋषी यांनी स्थापन केलेल्या नागेश्वर महादेव पिंडीस वज्रलेप कार्य सांगता करण्यासाठी साधारपणे पस्तीस जोडपे यांनी सहभागी होऊन दिनांक एक डिसेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत होम हवन पूजा सर्व ब्राम्हण वृंदानी यथोचित मंत्र म्हणून नागेश्वर महादेव पिंडीस अभिषेक व प्राण प्रतिष्ठा समारंभ पार पाडला दररोज अनुष्ठानास लहान मुले व भाविक गुरूचरित्र पारायण जपानुष्ठाण करण्यासाठी 28 नोव्हेंबर पासून 5 डिसेंबर पर्यंत करण्यासाठी बसले होते दररोज पहाटे व रात्री महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन झाले दिनांक 5 डिसेंबर रोजी सकाळी प्रवचन व विधी पूर्ण होऊन गावातून जनार्दन स्वामी यांची पालखी व स्वामी यांची सुशोभित ट्रॅक्टर मध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती नागेश्वर मंदिर ते पोलिस स्टेशन बाजार तळ सरकार वाडा नागनाथ मठ स्व लोकनेते विलासराव देशमुख यांचे प्रवेशव्दार कमान वेस मस्जिद खिंड महात्मा फुले चौक वैजापूर वेस माळी गल्ली सय्यदवली चौक महात्मा बसवेश्वर महाराज चौक मेनरोड गणपती चौक शिवाजी चौक बालाजी चौक हनुमान मंदिर बाजार तळ मार्गे नागेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली या मिरवणुकीत शेकडो महिलांनी व मुलीनी डोक्यावर कलस घेऊन हर्ष उल्हासात सहभाग नोंदवला होता नागेश्वर मंदिर परिसरात हजारो भाविकांनी महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या प्रवचनाने सांगता करण्यात आली हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या वेळी 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान दररोज रात्री महाप्रसाद अन्नदान करणाऱ्या दानशूर व्यक्तींना महामंडलेश्वर परमानंदगीरी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास ना छगनराव भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी भेट दिली व महामंडलेश्वर परमानंदगीरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले नागेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी अहोरात्र परिश्रम करणारे भक्तमंडळ स्वंयसेवक महिला भक्तमंडळ जनार्दन स्वामी भक्तमंडळ नागेश्वर भक्तमंडळ स्वामी परमानंदगिरी महाराज भक्तमंडळ यांनी परिश्रम घेतले ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने कार्यक्रम सुरळीत व यशस्वी पार पडला आहे नागेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने सर्व भाविकांचे स्वयंसेवक संघटना दानशूर व्यक्ती या भक्तमंडळ स्वंयसेवक या सर्वांचे आभार मानण्यात आले

अंदरसूल येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी तपोभूमी श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिर येथे जनार्दन स्वामी पुण्यस्मरण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे दत्तजयंती उत्सव गुरूचरित्र पारायण व जपानुष्ठाण सोहळा आणि पुरातन नागेश्वर मंदिर पिंडीस वज्रलेपन सोहळा सांगता प्रसंगी ना छगनराव भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांचा नागेश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांचे हस्ते सन्मान करतानासोबत उपाध्यक्ष भगवानशेठ घोडकेविश्वस्त सर्वश्री सुभाष गायकवाड एकनाथ सोनवणे, सुनिल देशमुख
