
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी ): – डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ गिरी, कचेश्वर शिंदे,रेखा खंडीझोड,सुनिल ससाणे आदी उपस्थित होते. उपस्थितींच्या हस्ते डॉ .आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या जीवन व कार्याचा पर्यवेक्षिका जयश्री पगारे, मानसी हिरे विद्यार्थ्यांनीसह उपशिक्षक रेवणनाथ कांगणे यांनी करून दिला.सम्यक रुपवते व संकल्प रुपवते यांनी डॉ. आंबेडकरांवर गीते सादर केली.
यावेळी बोलतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक उगले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आयुष्यभर कार्य केले.. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. जातीयभेद,सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले . डॉ आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे म्हणून डॉ. आंबेडकर यांचा कार्याचा इतरांनी आदर्श यावा असे आव्हान उगले यांनी शेवटी केले . सूत्रसंचालन कुमारी अंकिता ढोली हिंर तर आभार तनुजा निमसे हिने मानले. यावेळी डी.ए.रबडे,राजश्री बोडके, वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत,शिवाजी गुरुळे ,रामदास वारुंगसे, वृषाली घुमरे, किशोर शिंदे,रवि गोजरे,अरुण जारस,रेवगडे आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
