
मविप्र संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना विद्यालयातील मुख्याध्यापिका ज्योती काळे ,उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद.
नांदगाव — मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप मुख्याध्यापिका ज्योती काळे,उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण ,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे , व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी अपंग दिनाचे महत्त्व सांगताना दिव्यांगांच्या समस्या हक्क आणि त्यांच्या जीवनातील आव्हानांबद्दल सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण होणे. त्यांना आदर आणि संधी मिळाव्यात यासाठी प्रोत्साहन देणे.

दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती न दाखवता, त्यांना संधी उपलब्ध करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास प्रेरित करणे. दिव्यांग व्यक्तीं कला ,विज्ञान, क्रीडा किंवा तंत्रज्ञान अशा जीवनाचा प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करणे.
उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
