
जळगाव निंबायती (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्रांत सदस्यपदी प्राचार्य राजेश शिंदे यांची तर नासिक जिल्हा कार्यवाहपदी विजय बडे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याबद्दल शिक्षक परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह नाशिक शहराच्या आ. देवयानी फरांदे यांनी बडे व शिंदे यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी फरांदे यांनी शिक्षक परिषदेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासित केले.

प्रसंगी शिक्षक परिषदेचे विभाग प्रमुख सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे पाटील, शरद निकम, राजेश शिंदे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोरखराव कुणगर, टीडीएफचे ज्येष्ठ नेते त्र्यंबक मार्कंड, बी.डी.पाटील, संजय पाटील , शंकरराव सांगळे, विनीत पवार , संजय पवार, प्रा. अमोल अहिरे, शिंदे, नरेंद्र डेरले, दत्तात्रय ह्यालीज, सरोदे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र शेळके, संतोष उशीर, प्रमोद सोनवणे, संतोष उगलमुगले, प्रल्हाद कराड, नारायण चव्हाण समाधान चव्हाण, राजेंद्र शेळके, दत्तू मोरे, कांदळकर, हर्षद भागवत, संदीप बडे, रणदिवे, प्रदीप शेवाळे, प्रकाश बच्छाव परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.

शिक्षक परिषदेची सर्वसाधारण सभा रुंठा विद्यालय येथे सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीची सूचना मांडत सचिन पाटील यांनी विजय बडे हे कार्यवाह तर राजेश शिंदे प्रांत सदस्य म्हणून जाहीर केले या निवडीस सभेतील सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. शरद निकम यांनी अभिनंदनचा ठराव मांडला यावेळी मुख्याध्यापक गोरख कुणगर, त्र्यंबक मार्कंड, राजेश शिंदे, विजय बडे आदींची भाषणे झाली. शहर अध्यक्ष संजय पाटील यांनी आभार मानलेत.
