
सिन्नर ( प्रतिनिधी ) उजनी तालुका सिन्नर येथे प्रज्ञा बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. बुद्धमूर्तीची गावातून टाळ–मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. उपस्थित ग्रामस्थ व पुण्यशोधक बांधवांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला आगमन होताच पूजनीय भिक्खू करूणानंद महाथेरो यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. प्रज्ञा बुद्ध विहाराचे औपचारिक उद्घाटन मुंबईचे उद्योजक संदीप जी मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. विशेष म्हणजे बुद्धमूर्तीचे दानही संदीप जी मोरे यांनी मनोभावे केले.
या लोकार्पण सोहळ्यास परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शितलताई सांगळे, भारत कोकाटे, राजेश गडाख, भाऊदास सिरसाट सरपंच,जगन कटारनवरे, , दीपक पगारे, राजेंद्र मेहरखांब सर, बाळासाहेब काळे, महामित्र दत्ताजी वायचळे, शिवाजी बर्गे सर, कांदळकर सर, निवृत्ती सापनर सरपंच,किरण जगताप , मल्हारी साळवे आदी मान्यवरांनी मार्गदर्शक भाषणे केली.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व समाजघटकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. विशेष परिश्रम माधव जगताप सर, बाळासाहेब जगताप, मिलिंद जगताप, रवींद्र जगताप, बाळासाहेब काळे, अण्णा महानुभाव, लक्ष्मण मोरे, गौतम जगताप, सतीश जगताप, रामनाथ जगताप, नंदू जगताप , विशाल जगताप यांनी घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हा पवित्र आणि ऐतिहासिक सोहळा उत्तमरीत्या संपन्न झाला.
