
ओझर: दि.२८ वार्ताहर
मविप्र संचालित ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर इ.पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. वर्गशिक्षिका पल्लवी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फलक लेखन कला शिक्षिका सविता पवार, मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. आभार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी मानले.
