
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०३ वा दिवस
स्वर्ग नरक आकाशापलीकडील शासक इत्यादीसंबंधीच्या काल्पनिक कथांच्या किंवा खुळ्या समजुतींच्याद्वारे सर्वसामान्य लोकांना भुलवून आत्मत्यागाच्या ह्या एकमेव ध्येयाकडे नेले जाते. भ्रामक समजुतींना थारा न देता कामना-वासनांचा त्याग करून तत्त्वज्ञही बुद्धी पुरःसर याच ध्येयाकडे जात असतो. म्हणूनच बाह्य इंद्रियग्राह्य स्वर्गाचे किंवा सुवर्णयोगाचे अस्तित्व काल्पनिकच असते, परंतु आतल्या आतील स्वर्ग आधीचाच अस्तित्वात आहे. कस्तुरीचा सुगंध कुठून येत आहे, हे शोधू जाता कस्तुरीमृगाला तो बाहेर सापडवायचा नाही, सरते शेवटी त्याला तो स्वतःच्या ठायी सापडेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ७ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर २०२५
★ भीम जयंती
★ १८९० स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी.
★ १९६७ सशस्त्र क्रांतीकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक पांडूरंग महादेव ऊर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन.
★ समता दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
