
सिन्नर (प्रतिनिधी )२६ नोव्हेंबर विदर्भाचे रॉबिन हूड शामा दादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड च्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की विदर्भाचे रॉबिनहुड – शामा दादा कोलाम यांचा जन्म कोलाम जमातीत यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील कोंढा गावी २६ नोव्हेंबर १८९९ साली झाला. गरिबांचा रखवाला आणि धनदांडग्यांचा गर्दनकाळ अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी निजामाशी एकतर्फी झुंज दिली. इंग्रज, निजाम, सावकार, धनदांडग्या लोकांच्या विरोधात गरिबांसाठी त्यांनी हातात बंदूक घेऊन सशस्त्र संघर्ष केला.ते धनदांड्यांना लुटत आणि गरिबांना मदत करत त्यामुळे ते विदर्भाचे रॉबिनहुड म्हणून ओळखले जातात.

यवतमाळ जिल्ह्यातील बीटरगाव गावाच्या बाजूला चार किलोमीटवर शामा कोलाम टेकडी आहे. त्यांचा जन्म कळंब तालुक्यातील निरंजन माहूर या गावी झाला होता असेही काही लोक मानतात. ते एक सामान्य नागरिक होते. धनदांडग्या लोकांची गरिबांची करत असलेल्या शोषणाबाबत त्यांना चीड होती त्यामुळे ते धनदांडग्या लोकांना लुटत ती लूट टेकडीवर ठिकठिकाणी पुरून ठेवत होते. आणि त्या टेकडी जवळील घनदाट जंगलात त्यांचे वास्तव्य होते. अनेक लोक या टेकडीवर गुप्तधन शोधण्यासाठी जातात. इंग्रज शिपाई देखील त्यांच्या शोधासाठी या टेकडीवर येत.
कोलाम समाज आजही त्यांना मानतो आणि त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करतात.अशा या क्रांतिकारी व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन आकाश धोंगडे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार संदिप मुठे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,आकाश धोंगडे, संदिप मुठे,गोरख मुठे,लखन पाचोरे,पप्पू कांबळे, सुनिल गोफणे, अमोल वाजे शाम डागे, रमेश रेवगडे, किरण मुठे रोहित मुठे आदि.उपस्थित होते
