
सायखेडा (प्रतिनिधी) मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज सायखेडा. येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रामदास वाजे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा व संविधान पूजन केले .यावेळी
श्रुतीका डेरले , श्रीमती बागले मॅडम यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्त्व सांगितले ,तर अध्यक्षीय भाषणातून श्री रामदास वाजे यांनी लोकशाही सक्षम करण्यासाठी व मानवी हक्क,कर्तव्यांसाठी संविधान दिन साजरा करणे महत्त्वाचे आहे. असे त्यांनी सांगितले

.विद्यालयाचे उपशिक्षक मच्छिंद्र गोहाड यांनी विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेचे वाचन केले व सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाठीमागे म्हणून शपथ घेतली. विद्यालयामध्ये संविधानावर आधारित विविध घोषवाक्य फलक हातात घेऊन रॅली काढली ,त्यानंतर विद्यालयामध्ये मानवी साखळी तयार करण्यात आली

यामध्ये संविधान दिन नाव देखील काढण्यात आले .यामध्ये अभिनव बाल विकास मंदिरचे व जनता इंग्लिश स्कूल सायखेडा या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रम प्रसंगी उपमुख्याध्यापिका अलका अहिरे ,अभिनव मुख्याध्यापिका सविता बोरस्ते, पालक
उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.

