मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेेडीअम स्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान यांच्या प्रतिमापुजनाने करण्यात आली.
त्यानंतर भारतीय संविधानातील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांच्या जागरूकतेसाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील संविधान विद्यार्थीनीने सादर केले. विद्यार्थी - तनुज गुप्ता,निर्भवणे यांनी आपले विचार मांडले. सहकारी शिक्षिका सुप्रिया शिंदे यांनी संविधान दिन याविषयी, भारतीय संविधान , व त्याची निर्मिती त्यासाठी केलेला मसुदा व भारतीय संविधानाचे लिखित स्वरूप याविषयी माहिती दिली. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी *२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन* म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व व गरज मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.