नासाका विद्यालयात संविधानदिनी संविधान प्रास्ताविकेचे पूजन करताना मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीनाशिकरोड:-(प्रतिनिधी ) पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पगार, विद्यार्थी, सर्व शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
मुख्याध्यापक अरुण पगार यांनी संविधानाबद्दल विचार व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत संविधानाचे महत्त्व सांगितले. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते