
महाराष्ट्रातील साहित्यिकांसाठी नम्र निवेदन
ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले वाड्.मय पुरस्कारासाठी आवाहन
✍🏻 नियमावली:-
1) 1 जानेवारी 2024 ते 15 डिसेंबर 2025 ह्या दरम्यान प्रकाशित साहित्य पाठवावे.
2)कविता संग्रहासाठी स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार आणि ललित, कथासंग्रह, आत्मचरित्र, चरित्र यासाठी निळूभाऊ फुले वाड्.मय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत
3) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
4) विजेत्या साहित्यिकांना अखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनप्रसंगी हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क नाही.
5) पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही.
6) पुरस्कारासाठी पाठवलेली पुस्तके परत मिळणार नाहीत.
7) कोणीही परीक्षकांना परस्पर संपर्क करू नये.
8)15 डिसेंबर, 2025 पर्यत आलेले साहित्य ग्राह्य धरले जाईल. त्यानंतर आलेले साहित्य विचारात घेतले जाणार नाही.
9) पुरस्कार प्रदान सोहळा जानेवारी सन 2026 मध्ये होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात करण्यात येईल.
11) पुरस्कार कोणालाही घरपोच पाठवले जाणार नाहीत.
12) आपली साहित्यकृती कोणत्या प्रकारात बसते; ते पाहून दिलेल्या मोबाईल नंबरवर अधिकृतपणे कळवले जाईल
13) निकाल वैयक्तिक कळवला जाईल.
14) पुस्तकांच्या दोन प्रती पाठवाव्यात.
15) कोणत्याही एकाच विभागात साहित्यकृती पाठवावी.
16) निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही पुस्तकावर अभिप्राय मागू नये.
17) पुरस्कार घेण्यास उपस्थित राहता येत नसेल तर आपला प्रतिनिधी पाठवावा. किंवा त्यानंतर पुरस्कार चौकशी अथवा मागणी करू नये.
18) पुस्तकाची पहिली आवृत्तीच पाठवावी.
19) सर्व नियम व्यवस्थित वाचून, नियम मान्य असतील आणि कार्यक्रमात उपस्थित राहायला जमत असेल तरच आपली साहित्यकृती स्पर्धेसाठी पाठवावी. अन्यथा पाठवू नये.
अशी पुस्तकं पाठवा 👇👇👇
📕कविता/गझल/ललित/बालसाहित्य/कथासंग्रह/कादंबरी/समीक्षा/वैचारिक /आत्मचरित्र
📚 पुस्तक पाठविण्यासाठी पत्ता:-
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
गिरणा गौरव प्रतिष्ठान ऑफिस नं.8, पहिला मजला, पेठकर प्लाझा, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक-422003
☎️9970904728
4थे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन 2026
जगण्याचा निखळ आनंद
