
जुन्नर( शहर प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने निवडणुकी अगोदर राज्यातील गरजू जेष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी वार्धक्यातील आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तीन हजार पाचशे रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. त्याकरिता शासनाने अर्ज मागविले होते. गावोगाव खेडेपाड्यातून ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने अर्ज भरून पाठविले. परंतु अद्याप पर्यंत त्या अर्जांवर कार्यवाही होत नसून चौकशी केली असता निधी अभावी अर्ज धूळखात पडून आहेत अशी माहिती मिळाली. आमचे जुन्नरचे तालुका समन्वय समितीतर्फे सचिव श्री नामदेव दिघे सर व पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री विठ्ठल वायकर यांनी नुकतीच फेस्कॉमचे माजी अध्यक्ष श्री अरुण रोडे आणि सचिव श्री चंद्रकांत महामुनी यांचे समवेत माननीय श्री विशाल लोंढे सह आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली परंतु निराशा जनक उत्तर मिळाले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची ही योजना शासन तूर्तास अंमलात आणू शकत नाही असे दिसून आले.
