
वैनाकाठ ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगडे,नागपूर, शिक्षणसाथी संदीप देवरे,नंदुरबार, ,सुनील उबाळे,प्रसाद कुमठेकर,अशोक पवार, डॉ.विनोद राऊत,पुरुषोत्तम संबोधी यांना हे पुरस्कार जाहीर साहित्य, कला,संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या वैनाकाठ फाऊंडेशन भंडारातर्फे गेल्या तीन वर्षांपासून साहित्य ,समाज आणि शिक्षण या क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जात असते. हे पुरस्कार महाराष्ट्रात प्रतिष्ठेचे समजले जातात.साहित्य क्षेत्रातील पुरस्कारांसाठी महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातून प्रवेशिका नोव्हेंबर मध्ये मागविण्यात आल्या होत्या.त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यासाठी आम्हास जवळपास २५० च्या वर पुस्तके प्राप्त झाली होती.त्याची सुसंगत क्रमवारी लावणे ,प्राथमिक फेरीची निवड करणे आणि अंतिम फेरीत आलेले कवितासंग्रह ,कथासंग्रह, कादंबरी,समीक्षाग्रंथ आणि वैचारिक ग्रंथ इत्यादी साहित्यकृतीच्या परीक्षणाचे आणि मूल्यांकनाचे महत्वाचे कार्य डॉ . रेणुकादास उबाळे आणि इतर पाच तज्ज्ञ समितीने केले.त्याचा निकाल खालील प्रमाणे घोषित करीत आहोत.
१ *कवी मुकुंदराज काव्य पुरस्कार* *सुनील उबाळे,संभाजीनगर**उलट्या कडीचं घर**कैलास पब्लिकेशन्स,संभाजीनगर
*२ *कै.घनश्याम डोंगरे कथासंग्रह पुरस्कार* *प्रसाद कुमठेकर,वसई**इतर गोष्टी**पपायरस प्रकाशन, मुंबई*
३ *ना.रा.शेंडे कादंबरी पुरस्कार**अशोक पवार,चंद्रपूर**बेडा* *संधिकाल प्रकाशन ,भाईंदर( मुंबई)*
४ *डॉ .अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार**डॉ.विनोद राऊत, वर्धा* *नामदेव ढसाळ यांची कविता: आस्वाद आणि चिकित्सा**विजय प्रकाशन ,नागपूर*
५ *डॉ.आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार**पुरुषोत्तम संबोधी,नागपूर**धम्मक्रांतीची वाटचाल आणि प्रदुषणे**समता संगर प्रकाशन नागपूर* *पुरस्काराचे स्वरूप: ५००० रुपये रोख,सन्मानचिन्ह सन्मानपत्र, महावस्त्र पुष्पगुच्छ असे आहे.**
*समाजमित्र आणि शिक्षणसाथी* या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवल्या जात नाही.त्यासाठी वैनाकाठ फाऊंडेशन भंडाराच्या कार्यकारणीचे सन्माननीय सदस्य हे विविध माध्यमातून अभ्यास करून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योग्य व्यक्तीस हे पुरस्कार जाहीर करीत असतात.*
*यावर्षीचे पुरस्कार असे*
६ *महात्मा कालिचरण नंदागवळी समाजमित्र पुरस्कार**विलास भोंगडे,नागपूर**ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते*
७ *जे. पी. नाईक शिक्षणसाथी पुरस्कार* *संदीप देवरे,नंदुरबार*
*यंग फाऊंडेशन नंदुरबार**पुरस्काराचे स्वरूप:११००० रुपये रोख सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,महावस्त्र पुष्पगुच्छ असे आहे* हे पुरस्काराचे तिसरे वर्ष असून याआधी हे पुरस्कार *ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा,लेखा मेंढा , ॲड. पारोमिता गोस्वामी,चंद्रपूर, मेळघाट येथे भिल्ल कोरकुंच्या मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात महत्वाचे कार्य करणारे प्रश्नचिन्ह फाऊंडेशनचे मतीन भोसले ,मेळघाट तसेच उच्च शिक्षणासाठी आदिवासी मुलांना सर्वप्रकारची भरीव मदत करणारे प्रवीण निकम ,पुणे या मान्यवरांना देण्यात आलेले होते*.हे पुरस्कार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे खूप खूप अभिनंदन!
विवेक कापगते
सचिव वैनाकाठ फाऊंडेशन,भंडारा*
