
लासलगाव ( प्रतिनिधी )कवी, गीतकार गुरुवर्य आदरणीय श्री.प्रकाशजी होळकर सर यांना ‘दु:खी’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर. जालना येथील दिवंगत नंदकिशोर सहानी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै.राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘दुःखी’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार कवी- गीतकार आमचे गुरुवर्य आदरणीय श्री. प्रकाशजी होळकर सर यांना जाहीर झाला आहे. येत्या गुढीपाडव्याला जालना येथे रविवारी (ता.30) सायंकाळी ‘कवितेचा पाडवा’ या गाजलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.. मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सर.
नांदगाव म.सा.प. शाखेतर्फे व गणतंत्र न्युज तर्फे गीतकार , गुरुवर्य आदरणीय प्रा.प्रकाशजी होळकर यांचे हार्दिक अभिनंदन!!
