
ओझर: (वार्ताहर) 100 दिवसीय टिबीमुक्त भारत अभियान 7 डिसेंबर 2024 पासुन 24 मार्च 2025 पर्यत राबविण्यात आले. नाशिक जिल्हयात मा.मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्यअधिकारी मा. डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी मा.डॉ.रविंद्र चौधरी डॉ.मोनाली कदम WHO, मा.श्री कोशिरे तालुका आरोग्य अधिकारी निफाड यांच्या मार्गदर्शनाने आज दि. 23/3/25 रोजी पिंपळगाव बसवंत येथे “24 मार्च जागतिक क्षयरोग” दिनानिमित्त दिंडोरी मतदार संघाचे खासदार मा. भास्करराव भगरेसर यांच्या हस्ते निक्षयमित्र योजने अंतर्गत क्षयरूण्नांना रूग्ण पोषक आहाराचे किट वाटप करण्यात आले. आणि क्षयरोग विषयीची शपथ घेण्यात आली. यावेळी श्रीमती साधना बच्छाव ( जिल्हा समन्वयक) श्री राजेश वराडे क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, श्री नरहरी सानप क्षययरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, श्री मोनिश केदारे TBHV, श्री दिपक चव्हाण आरोग्यसेवक उपस्थित होते.
